Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ९ हजार ८३० नवीन कोरोनाबाधित तर ५ हजार ८९० रूग्ण कोरोनामुक्त

Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात आज दिवसभरात राज्यात ५ हजार ८९० रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के झाले आहे. तर, राज्यात आज ९ हजार ८३० नवीन कोरोनाबाधित आढळले असून, २३६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, राज्यात आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,८८,५७,६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,४४,७१० (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५०,६६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,९६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,३९,९६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात घरोघरी लसीकरण: पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटाला प्राधान्य

दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीजास्त लसीकरण तसेच घरोघरी लसीकरणाची भूमिका राज्य कृतीदलाने घेतली आहे. तसेच लसीकरणाचा गोंधळ उडू नये यासाठी पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटातील लोकांचे अग्रक्रमाने लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!