Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : “त्या ” महिला पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

Spread the love

मेट्रो मेनियावरील ओळखीतून घडला प्रकार

औरंगाबाद : पतीपासून फारकत घेतल्यानंतर मेट्रो मेनिया या वेबसाईटवर नव्याने जोडीदार शोधणा-या मुंबईतील महिला सहायक पोलीस निरीक्षकावर अत्याचार केलेल्या बँक कर्मचा-याला मंगळवारी सकाळी अंधेरी पोलिसांनी धूत  हॉस्पीटलसमोरील म्हाडा कॉलनीतून ताब्यात घेतले. संदीप भरतराव ठाकुर (३८, रा. श्रध्दा कॉलनी, म्हाडा कॉलनी, ताजनापूर) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे स्वत:ची फारकत होण्यापुर्वीच त्याने मेट्रो मेनिया या वेबसाईटवर गेल्या दिड वर्षांपूर्वी  सहायक पोलिस निरीक्षक महिलेशी ओळख करुन घेतली होती. त्यानंतर त्याने गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुंबईतील  एका महिला सहायक पोलीस निरीक्षकाची पतीसोबत फारकत झालेली आहे. त्यामुळे नवीन जोडीदार शोधण्यासाठी पीडीताने मेट्रो मेनिया या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले होते. तर दुसरीकडे औरंगाबादेतील एका बँकेत कामाला असलेल्या संदीप ठाकुर याने पत्नीशी फारकत होण्यापुर्वीच मेट्रो मेनियावर रजिस्ट्रेशन केले. त्यातून पीडीतेची संदीप ठाकुरसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या मोबाइल क्रमांकाची अदलाबदली केली. पुढे संदीप ठाकुर आणि पीडीता एकमेकांना पवई भागात भेटले. त्यावेळी संदीप ठाकुर याने पीडीतेला शितपेयात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर एका ठिकाणी अत्याचार केला. याप्रकारानंतर अचानक संदीप ठाकुर याची पत्नी त्याच्याकडे राहण्यासाठी आली. मात्र, संदीप ठाकुरची पत्नीसोबत राहण्याची इच्छा नव्हती.

याचदरम्यान पीडीतेचा नौदलातील एका जवानासोबत विवाह ठरला. ही बाब संदीप ठाकुरला कळताच त्याने विवाह मोडण्यासाठी नौदलातील जवानाला पीडीतेसोबत केलेल्या शारिरीक संबंधाचा व्हिडीओ पाठवला. त्यामुळे पीडीतेचा विवाह मोडला. याचदरम्यान, कोटला कॉलनीतील एका वकिलासह अन्य एकाने देखील पीडीतेला धमकावले. त्यामुळे पीडीतेने १२ जून रोजी पवई पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द तक्रार दिली. त्यावरुन आज सकाळी औरंगाबादला पोहोचलेल्या अंधेरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय आचरेकर, पोलीस नाईक सोनवणे, गोसावी व वरे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मुख्य आरोपी संदीप ठाकुर याला सकाळी सातच्या सुमारास श्रध्दा कॉलनीतून ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याला अंधेरी पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले. याप्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक सातवसे या करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!