Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : देशभरात 50 इनोव्हेटिव्ह मॉड्यूलर रुग्णालये,  पहिल्या टप्प्यात राज्यातील  तीन शहरांचा समावेश 

Spread the love

नवी दिल्ली : देश अजूनही कोरोना व्हायरससारख्या महामारीचा सामना करत आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसरी लाटेची तयारी केंद्र सरकारकडून सुरु झाली आहे. केंद्र सरकार येत्या दोन ते तीन महिन्यात देशभरात 50 इनोव्हेटिव्ह मॉड्यूलर रुग्णालये सुरु करण्याचा विचार करत आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या एका रिपोर्टनुसार, मूलभूत पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी हे मॉड्यूलर रुग्णालये बांधली जातील. सध्याच्या रुग्णालयातील विद्यमान पायाभूत सुविधांचा भार कमी व्हावा या उद्देशानं या मॉड्यूलर रुग्णालयांची बांधणी होणार असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात पुणे, अमरावतीआणि जालना येथे पहिल्या टप्प्यात हि रुग्णालये उभारण्यात येणार आहेत.

या वृत्तानुसार , आयसीच्या 100 बेड्ससोबत अशी 50 मॉड्यूलर रुग्णालये तयार केली  जातील. तीन आठवड्यात बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयांना जवळपास 3 कोटींच्या आसपास खर्च होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 6 ते 7 आठवड्यात हे रुग्णालय पूर्णपणे कार्यरत होतील. यात पहिल्या टप्प्यात बिलासपूर, अमरावती, पुणे, जालना आणि मोहालीमध्ये 100 बेड्स मॉड्यूलर रुग्णालय उभारण्यात येणार आहे.  या अंतर्गत रायपूरमध्ये 20 बेड्सचे रुग्णालय  तर बंगळुरूमध्ये 20, 50 आणि 100 बेड्सचं एक- एक रुग्णालय तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे ही मॉड्यूलर रुग्णालय पुढचे 25 वर्षापर्यंत टिकू शकतात. तसेच एका आठवड्यापेक्षा कमी वेळेत नष्टही केले जाऊ शकतात आणि कुठेही घेऊन  जाता येतात.

देशाच्या विविध भागात कोविड -19 चे रुग्ण वाढल्याने  रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव होता. त्यामुळे मॉड्यूलर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णालयांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे. मॉड्यूलर रुग्णालय म्हणजे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आहे आणि आता विद्यमान रुग्णालयाच्या इमारती शेजारीच ही रुग्णालयते बांधले जाऊ शकते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!