Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : भरदिवसा महिलेने ५ लाखांचे दागिने उघड्या घरातून नेले, घटना सी.सी.टि.व्हीत.कैद

Spread the love

औरंगाबाद – निवृत्त अधिकारी दुपारी दार उघडे ठेवून आराम करंत असतांना एन२सदाशिवनगरातून ५लाखांचे बॅग मधे ठेवलेले दागिने एका महिलेने चोरुन नेल्याचा गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या प्रकरणी एका संशयित महिलेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

रमेश कोंडू तायडे (६२) असे फिर्यादीचे नाव आहे. महामार्ग प्रकल्प कार्यालय जालना येथून ते सेवानिवृत्त झाले आहेत. आज दुपारी (११मे)३च्या सुमारास तायडे गरमी होत असल्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवून आराम करंत होते.त्यावेळेस एका महिलेने घरात घुसुन दागिने चोरुन नेले.ही घटना सी.सी. टि.व्ही.मधे कैद झाली आहे. दुपारी ४वा.तायडे झोपेतून उठल्यावर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कर्मचार्‍यांना देत हा तपास पीएसआय अमोल म्हस्के यांच्याकडे दिला.घटनास्थळी गुन्हेशाखेच्या अधिकार्‍यांनी भेट दिली.तसेच उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर नवले यांनी भेट देत परिसरातील सी.सी. टि.व्ही. चेक केले.त्यावेळेस एक महिला चोरी करुन घराबाहेर पडली व रिक्षातून चिकलठाण्याकडे जातांना दिसले.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास करुन    प्रतिक्षा नाडे नामक महिलेला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडून अर्ध्याच्यावर मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल म्हस्के या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!