Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर लावले म्हणून मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Spread the love

हनुमानगढ : अलीकडच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सर्वत्र आदराने घेतले जात असले तरी अनेक ठिकाणी जातीय तणावातून आंबेडकरांचे नाव घेतले किंवा फोटो लावला म्हणून अन्याय अत्याचार होत आहेत . राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यामध्ये असाच प्रकार घडला असून या घटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर लावले म्हणून गावातील जमावाने २१ वर्षीय तरुणाला जबर मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी ओबीसी असल्याचे वृत्त आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , गेल्या काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर प्रकरणी सुरु असलेल्या वादाने चांगलाच पेट घेतला. त्यामुळे ओबीसी समाजाच्या काही जणांनी या दलित युवकाला अमानुष मारहाण केल्याचे वृत्त आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या २१ वर्षीय युवकाने प्राण सोडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानगढच्या किकरालिया गावाचा रहिवासी असलेला विनोद बामनिया हा भीम आर्मीचा सदस्य होता. त्याच्यावर ५ जून रोजी ओबीसी समाजाच्या काही लोकांनी हल्ला केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर विनोदला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दोन दिवसांतच त्याचं निधन झाले.

याबाबत पोलिसांनी म्हटले आहे की, या प्रकरणात विनोदच्या परिवाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एका व्यक्तीचे नाव अनिल सिहाग असून दुसरी व्यक्ती राकेश सिहाग आहे. या दोघांविरोधात पोस्टर फाडल्याप्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. या दोघांनी मारहाण करत असतानाच जातीय वक्तव्य केलं असल्याचेही या एफआयआरमध्ये लिहिले आहे. दरम्यान यापूर्वीही विनोद आणि त्याच्या परिवारावर हल्ला झाल्याची तक्रार त्याने पोलिसांत दाखल केली होती .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!