Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची औरंगाबादेत कारवाई , खाजगी एजंटाला बेड्या, बॅंक अधिकार्‍यावर गुन्हा

Spread the love

औरंगाबाद -पैठणगेटपरिसरातील युनियन बॅंक आॅफ इंडीयाच्या व्यवस्थापकावर आणि बॅंकेच्या रिकव्हरी एजंटवर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १लाख रु लाच मंडप व्यावसायिकाला मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.त्यापैकी एजंटला अटक केली आहे.अशी माहिती पोलिस अधिक्षक डाॅ. एम.आर. कडोळे यांनी दिली. युनियन बॅंकेचे व्यवस्थापक जयप्रकाश झा आणि रिकव्हरी एजंट सुरेश भालेराव अशी आरोपींची नावे आहेत.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , शहरातील चेलीपुरा परिसरात राहणारे मंडप व्यावसायिक शुभम प्रकाश इंगळे यांनी डिसेंबर २०१८ मधे पंतप्रधान रोजगार योजने अंतर्गत मंडप डेकोरेशन व्यवसायासाठी १०लाख रु.ची मागणी केली होती.इंगळे यांचा प्रस्ताव शहरातील पैठणगेट परिसरातील युनीयन बॅंकेच्या मुख्य कार्यालयात मंजूरीसाठी आला.म्हणून इंगळे यांनी बॅंकेत संपर्क केला असता.बॅंकेचा रिकव्हरी एजंट सुरेश भालेराव ने इंगळेंकडे १लाख रु.ची मागणी केली. दरम्यान जानेवारी २१मधे पंतप्रधान रोजगार निर्मीती योजनेअंतर्गत १०लाख रु. कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज इंगळे यांच्या मोबाईलवर आला.

यानंतर १लाख रु.चहापानासाठी मागणार्‍या बॅंक व्यवस्थापक जयप्रकाश झा याने मार्च २१ मध्ये   ५लाख रु.इंगळे यांना दिले व चहापानासाठी १लाख रु.मागितले.पण ते देण्याची इच्छा नसल्यामुळे शुभम इंगळै यांनी २ जून रोजी सीबीआय च्या लाचलुचपत विभागाकडे झा आणि भालेराव यांच्या विरोधात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक मुकेश प्रचंड यांनी विशेष साक्षीदारांच्या उपस्थितीत इंगळे यांच्या तक्रारीची खातरजमा करुन घेतली.व ४ जून रोजी पुण्यातील सीबीआयच्या एसीबी कार्यालयात गुन्हा दाखल केला.व त्यानंतर झालेल्या कारवाईत रिकव्हरी एजंट सुरेश भालेरावला बेड्या ठोकल्या व झा यांची कसुन चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!