IndiaNewsUpdate : एनबीटीच्या माध्यमातून देशातल्या तरुण लेखकांसाठी पंतप्रधानांची योजना

Advertisements
Advertisements
Spread the love

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनबीटीच्या माध्यमातून देशातल्या तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘YUVA: Prime Minister’s योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांमधील लेखनशैलीला प्रोत्साहन दिले  जाणार आहे. ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा करताना. “ देशातल्या तरुणांना आता नवीन संधी मिळणार असून, तुमच्या कौशल्याने देशाच्या प्रगतीला हातभार लागणार’ असल्याचे  म्हटले आहे. प्रसिद्ध लेखक होण्याची संधी असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisements

देशातल्या नवख्या तरूण लेखकांसाठी ही योजना आहे. देशभरातले ३० वर्षाखालील नवीन लेखकांना त्यांच्या ध्येय्यापर्यंत नेण्यासाठी ही योजना मदत करेल, त्यामुळे आपल्या वेगवेलळ्या प्रोजेक्टच्या माध्यनातून लेखाकांना जागतिक पातळीवर पोहचता येईल, त्याशिवाय भारतीय संस्कृती आणि भाषांच्या अमुल्या ठेव्याचाही अभ्यास करता येईल.

Advertisements
Advertisements

कशी निवड होईल ?

सुरवातीला देशभरातून ७५ लेखकांची यासाठी निवड केली जाईल.

एनबीटीकडून स्थापन करण्यात आलेल्या कमिटीकडून त्यांची निवड करण्यात येईल.

यासाठी ४ जून ते ३१ जूलै २०२१ पर्यंत एक स्पर्धा घेण्यात येणार आहे.

त्यासाठी निवड झालेल्या स्पर्धकांना ५००० पानांचं लेखन सादर करावं लागणार आहे. ज्याचं पुढे पुस्तक तयार करण्यात येणार आहे.

१५ ऑगस्ट २०२१ ला निवड झालेल्या लेखकाच्या नावाची घोषणा होणार आहे.

नियमांनुसार निवडलेलं लेखक कमिटीच्या मार्गदर्शनाखाली अंतिम निवडीसाठी हस्तलिखीतं तयार करतील.

त्यानंतर १५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्यादिनी विजेत्या लेखकाचं साहित्य प्रकाशित केलं जाईल.

१२ जानेवारी २०२१ ला युवा दिवस म्हणजेच ‘नॅश्नल युथ डे’ला या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.

असे असेल प्रशिक्षण

नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) विजेत्यांसाठी दोन आठवड्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करणार आहे,.

NBT च्या दोन लेखकांकडून नव्या लेखकांना प्रशिक्षण दिले  जाईल.

NBT कडून दोन आडवड्याच्या ऑनलाईन प्रशिक्षणानंतर आणखीन दोन  आठवडे ऑनलाईन आणि विविध साईटवरूनही प्रशिक्षण दिले  जाईल.
दुसरा टप्पा -तीन  महिन्यांचे  प्रशिक्षण

साहित्य महोत्सव,पुस्तक मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये तरुण लेखकांना सहभागी होता येईल. त्यामुळे त्यांचा कौशल्य विकास होईल.

त्यानंतर लेखकाला शिष्यवृत्ती म्हणून दरमहा ५०,००० रुपये ६ महिन्यासाठी म्हणजेच ३ लाख रुपये देण्यात येतील.

याचं कार्यक्रमाचा भाग म्हणून युवा लेखकांनी लिहिलेलं पुस्तक किंवा पुस्तकांची मालिका एनबीटी,भारत प्रकाशित करेल.मेंटर्सशिप प्रोग्रामच्या शेवटी लेखकांच्या पुस्तकांच्या यशस्वी प्रकाशनांवर १० % रॉयल्टी दिली जाईल.त्यांची प्रकाशित पुस्तकं इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित केली जातील,

आपलं सरकार