Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : फाईव्हस्टार भामटा गजाआड , बड्या हॉटेलात थांबून असा घालायचा गंडा !!

Spread the love

हाॅटेल कीज ला ३० हजारांना गंडवले, शहरातील इतर हाॅटेल्सना दहा वर्षांपूर्वी घातला होता लाखोंचा गंडा

औरंगाबाद – शहरासह मुंबईतील ताज हाॅटेल्स ला काॅन्फरन्स घ्यायच्या थापा मारुन हाॅटेल मधील लॅपटाॅप प्राॅजेक्टर गायब करणार्‍या तामिळ भामट्याला हाॅटेल कीज च्या व्यवस्थापनाने पकडून वेदांतनगर पोलिसांच्या हवाली केले.

जॉन ज्ञानप्रकाश विन्सेन्ट ऊर्फ भिमसेंट जॉन वय 64 वर्ष , रा . 29 नटराजपुरम , किला अरसदी , तुतुकडी , तामीळनाडू . असे अटक आरोपीचे नाव आहे.त्याच्यावर मुंबईतील कफपरेड पोलिस ठाणे, कर्नाटकातील धारवाड पोलिस ठाणे,गोवा, विशाखापट्टणम दिल्ली, कोलकत्ता या ठिकाणी फाईव्हस्टार हाॅटेल्स ना गंडा घातल्याचे गुन्हे दाखल आहेत. शहरात २००७ ते २०१२साली हाॅटेल रामा इंटरनॅशनल, अजंटा अॅंबेसिडर, लेमन ट्री या ठिकाणी ही गंडा घातल्यानंतर सिडको पोलिस ठाण्षाचे तत्कालिन पोलिस निरीक्षक मारुती डब्बेवाड, व पीएसआय कृष्णा शिंदे यांनी अटक केली होती.अशी माहिती पोलिस तपासात उघंड झाली आहे. त्यावेळेस  त्याने रवी आनंद असे नाव वापरले होते.


फसवणुक केलेली रक्कम :- १ ) हॉटेल किज 2,974 / – रुपयांचे जेवण २ ) 2800 / -रुपयांचे 14 पॉकेट सिगारेट ३ ) 5,730 / – रुपयांची दारू , ४ ) 265 लॉन्ड्रीरुपये , ५ ) राहण्याचे 6,000 / – ( 1708 रुपये टॅक्स ) असे एकूण 19,477-


हाॅटेल कीज मधे आरोपी जाॅन हा दोन दिवसांपासून मुक्कामास होता. महागडी दारु, आणि सिगारेट ची मागणी हाॅटेलकडे केल्यावर व्यवस्थापकाने एडव्हान्स पैसे  मागितले.तेंव्हा आरोपीने पैसे  नसल्याचे सांगताच मॅनेजर ने आरोपी जाॅन बाबत नेटवर माहिती चेक केली असता तो भामटा असल्याचे लक्षात आले. कीज व्यवस्थापनाने या संदर्भात वेदांतनगर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भामट्याला सापळा लावून अटक केली. एपीआय अनिल कंकाळ व इतर पोलिस कर्मचार्‍यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!