ViralVideo : चर्चेतली बातमी : गजानन बुवा चिकणकरच्या व्हायरल व्हिडीओ नंतर पोलिसांनी बघा काय केले ?

Advertisements
Advertisements
Spread the love

कल्याण : आपल्या वयोवृद्ध पत्नीला चापटांनी , लाथांनी आणि हातातील बकेटने एक वृद्ध इसम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ आपण पहिलाच असेल. सोशल व्हिडिओवर व्हरायल झालेल्या या व्हिडिओचा मागोवा घेत पोलीस या वृद्धाच्या घरी पोहोचले तेंव्हा हे ह.भ.प .महाराज आळंदीला गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी कुटुंबियांना समज देऊन आपली जबाबदारी पार पाडली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ आठवड्याभरापूर्वीचा असून सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. वृद्ध पत्नीला अमानुषपणे होणारी मारहाण पाहून संताप व्यक्त केला जात आहे. कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावातील हद्दीत हा प्रकार घडला आहे.

Advertisements

पोलिसांच्या माहितीनुसार गजानन बुवा चिकणकर असं माहाण कऱणाऱ्या या वृद्धांचं नाव आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे पाण्याच्या वादातून ते आपल्या पत्नीला जाब विचारत असून यावेळी बादलीने तसंच चापट – बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. त्यावर वृद्ध महिला वारंवार मला मारु नका अशी विनंती करत असतानाही हा कथित महाराज मात्र तिला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी घऱात इतर महिलाही घरात काम करताना दिसतात मात्र यात कोणीही मध्यस्थी किंवा तिला वाचविण्यासाठी मदत करताना दिसत नाहीत.

Advertisements
Advertisements

पोलिसांच्या माहितीनुसार सदर वृद्ध महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आजोबांकडून होणारी अमानुष मारहाण कॅमेऱ्यात कैद केली आहे. ३१ मे रोजी ही घटना घडली असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस या घटनेची दखल घेत या महाराजांच्या घरी पोहोचले तेंव्हा हे गजानन बुवा चिकणकर वारीसाठी आळंदीला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र या बुवाच्या पीडित पत्नीने पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नसल्याने गजानन बुवा चिकणकर यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून हा बुवा भेटल्यानंतर समाज देण्याचा विचार करीत पोलीस आले तसे निघून गेले.

आपलं सरकार