Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : रासायनिक कंपनीला भीषण आग , 17 कामगारांचा होरपळून मृत्यू

Spread the love

पुणे : पुण्याच्या मुळशी तालुक्यातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीला भीषण आग लागली असून या आगीमध्ये १७ कामगारांचा मृत्यू झाला असून मरण पावलेल्या १३ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. १७ कामगार अजूनही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे आठ बंबी  घटनास्थळी प्रयत्न करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले  असून, सध्या याठिकाणी कुलिंग करण्याचे  काम सुरू असल्याचे सांगण्यात आहे.

दरम्यान या केमिकल कंपनीत याठिकाणी सॅनिटायजर तयार केले जाते.  सकाळी ४१ कर्मचारी कामासाठी आले होते. या ४१ पैकी अनेक लोकं मिसिंग आहेत. आतापर्यंत १३ मृतदेह जळून खाक झालेल्या अवस्थेत मिळाली, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.

पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या अरवडे गावाजवळ ही घटना घडली आहे. वॉटर प्युरिफायर तयार करणाऱ्या कंपनीला ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले  आहे. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी जेसीबीच्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचाही प्रय्तन करण्यात आला. तहसीलदार अभय चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली.

आग लागेल्या कंपनीमध्ये वॉटर प्युरिफायरचे  उत्पादन केले जाते.  आग लागण्याचं नेमकं कारण काय याची अद्याप माहिती मिळालेली नाही. आग पूर्ण विझवल्यानंतर याबाबत माहिती मिळू शकणार आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सध्या याठिकाणी कुलिंगचं काम केलं जात आहे. आगीतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!