IndiaNewsUpdate : देशाला उद्धेशून नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई  : अचानक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी  जनतेशी  नेमका कशासाठी संवाद साधणार ? यावरून वेगवेगळे अंदाज बांधले जात असतानाच पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या पार्शवभूमीवर   ‘देशात यापुढे सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे,  लसींच्या बाबतची राज्यांवरील जबाबदारी ही आता केंद्राकडेच असणार आहे, अशी मोठी घोषणा केली. 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे.

Advertisements

पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले कि , ‘१ मेपासून १८ वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम राज्यांवर २५ टक्के सोपवले होते. त्यांनी आपल्या परीने काम केले. पण, हे काम करत असताना किती अडचणी येतात हे लक्षात आले. संपूर्ण देशात काय परिस्थिती आहे. ते यांच्या लक्षात आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आणि लोकांकडून लशी मागणी वाढली. त्यामुळे राज्य सरकारांना कळून चुकले की पहिली व्यवस्था ही चांगली होती. एक चांगली गोष्ट राहिली, राज्य सरकार हे फेरविचार करून आमच्याकडे आले आणि देशातील नागरिकांना त्रास होऊ नये. त्यामुळे राज्य सरकारच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राकडे घेण्यात आली आहे. देशातील सर्व लोकांना मोफत लस मिळणार आहे, अशी घोषणा मोदींनी केली.

Advertisements
Advertisements

खासगी रुग्णालयांना १५० रुपये सर्व्हिस चार्जची मुभा

२१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, त्या निमित्ताने १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत लस देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पुढील कार्य पूर्ण करायचे आहे, असेही मोदींना स्पष्ट केले. तसंच, ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नसेल, त्यांना खासगी रुग्णालयामध्ये लस घ्यायची असेल तर ते पैसे देऊन लस विकत घेऊ शकतात. लसीची जी किंमत आहे, त्यावर १५० सर्व्हिस चार्जच खासगी हॉस्पिटल घेऊ शकतात, असेही मोदींनी स्पष्ट केले.

‘देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. कोरोनाविरोधातल्या लढाईत आपण अनेकानां गमावलं. कोरोनामुळे ज्या लोकांचा मृ्त्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबांसोबत माझ्या सहवेदना कायम आहे. गेल्या १०० वर्षातली ही मोठी महामारी आहे. कोविड हॉस्पिटल, औषध सेवा पुरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. नौदल, वायू सेना सर्वांनी जीवाची बाजी लावून काम केले.’ असं सांगत कोरोना योद्ध्यांचं मोदींनी कौतुक केलं. आपल्या प्रयत्नात जेव्हा यश मिळते जेव्हा तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल. आपल्या शास्त्रांनी लस निर्माण करण्याची क्षमता होती, याबद्दल पूर्ण विश्वास होता. कोरोना काळात कोरोना लस टास्क फोर्सची निर्मिती केली. लस घेण्यासाठी मदत केली. सात वेगवेगळ्या कंपन्या काम करत आहे. आणखी ३ कंपन्या काम करत आहे, असंही मोदींनी सांगितलं.

८० कोटी गरीबांना मोफत धान्य

हातावर पोट असण्याऱ्यांसाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपर्यंत ८० कोटी गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे. मे व जूनपर्यंत लागू असलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत वाढवणार आहोत. महामारीच्या काळात सरकार गरीबांच्या मदतीला त्यांचा बरोबरीने आहे. नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार आहे. गरीबांना उपाशी झोपायला लागू नये अशी इच्छा आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

नाकावाटे देण्यात येणाऱ्या व्हॅक्सिनवर संशोधन

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी लहान मुलांबाबत चिंता व्यक्त केली होती. या दिशेने देखील दोन लसींची ट्रायल वेगाने सुरू आहे. याशिवाय आता देशात नाकावाटे देण्यात येणाऱ्या व्हॅक्सिनवर देखील संशोधन सुरू आहे. याला सूई वाटे न देता नाकात स्प्रे केलं जाणार आहे. देशाला जर नजीकच्या काळात या लसीवर यश मिळालं तर यामुळे भारताच्या लसीकरण मोहीमेस आणखी गती येईल.” असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदींनी भारत हा करोनाविरुद्धचा लढा नक्की जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच करोनाचे निर्बंध उठले असले तरी बेजबाबदारपणे वागणं चुकीचं ठरेल असं सांगत मोदींनी अनलॉकमध्ये सुद्धा करोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं.

आपलं सरकार