Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : राज्यात १० हजार २१९ नवे रुग्ण , २१ हजार ०८१ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

मुंबई :  गेल्या २४ तासात राज्यात  १० हजार २१९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून यात दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्णांच्या संख्येहून दुपटीहून अधिकच आहे. आज एकूण २१ हजार ०८१ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडाही घसरला असून दिवसभरात १५४ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या १५४ मृत्यूच्या आकड्याबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ६४ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ टक्क्यांवर पोहोचले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

https://twitter.com/rajeshtope11/status/1401910645897850887

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ३२० इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी त्यात  घट होताना दिसत आहे ही दिलासादायक बाब आहे. पुण्यात एकूण १९ हजार ६४५ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १७ हजार ५९१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ६५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ५२० इतकी आहे.

नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७ हजार ९७० इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ३२६ इतकी आहे. या बरोबरच अहमदनगरमध्ये ७ हजार ०६१ इतकी आहे. औरंगाबादमध्ये २ हजार ३४९, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ५८८ इतकी आहे. जळगावमध्ये ३ हजार ३०९, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ७५५ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या २ हजार ९०२, तर, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गोंदिया जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ४४५ इतकी आहे.

१२,४७,०३३ व्यक्ती होम क्वारंटाईन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६६ लाख ९६ हजार १३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख ४२ हजार (१५.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२ लाख ४७ हजार ०३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर, ६ हजार २३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतही कोरोनामुक्त रुग्ण अधिक

गेल्या चोवीस तासांत मुंबईत ७२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत आतापर्यंत ६,७९,२५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या १५,७८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दरही आता ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा कालावधी ५५० दिवसांवर पोहोचला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!