Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaInformationUpdate : कोरोनाला घाबरू नका , समजून घ्या नव्या गाईडलाईन !!

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनावरील उपचारासाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करत नव्या सूचना जारी केल्या आहेत. यानुसार ज्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत त्यांना कुठल्याही औषधं घेण्याची गरज नाही. पण दुसऱ्या आजारांसाठी जी औषधं सुरू आहेत ती घेत रहावीत. अशा रुग्णांनी टेली कन्सल्टेशन घेतले पाहिजे. चांगला आहार , मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेसने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार कोरोनाची लक्षण दिसत नसलेल्या रुग्णांना उपचारासाठी वापरण्यात येणारी सर्व औषधं यादीतून हटवण्यात आली आहेत. यात ताप आणि सर्दी-खोकल्याच्या औषधांचाही समावेश आहे. अशा रुग्णांना इतर चाचण्या करण्याची गरज नाही, असे सूचनांमध्ये म्हटले आहे. यापूर्वी २७ मे रोजी मार्दगर्शकसूचना जारी करण्यात आल्या होत्या. ज्यात सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आइवरमेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, जिंक आणि मल्टीविटामिन या औषधांच्या वापरास मनाई करण्यात आली होती. तसेच एसिम्प्टेमेटीक म्हणजे लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांना सीटी स्कॅन सारख्या अनावश्यक चाचण्या लिहून देण्यासही मनाई करण्यात आली होती.

आयसीएमआरच्या कोरोनावर नव्या मार्गदर्शक सूचना

> करोनातून बरे झाल्यानंतर आपल्या रक्तातील शुगर तपासत राहा आणि ती नियंत्रित ठेवा
> डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्टेरॉइडचा उपयोग करा

> अँटीबायोकीट आणि अँटीफंगल औषधांचा उपयोग हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये

> ऑक्सिजन घेत असल्यास ह्यूमिडिफायरमध्ये स्वच्छ पाणी वापरा

> हायपरग्लाइसीमियाला नियंत्रित ठेवा
> इम्युनिटी बुस्टर म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं बंद करावीत

> अँटीफंगल प्रोफिलँक्सिसची गरज नसल्यास ते घेऊ नये

> आपल्या शरीरात पाणी कमी होऊ देऊ नका
> वाफ घ्यायची गरज नाही.
> कोणतीही व्हिटॅमिनची गोळी किंवा झिंकची गोळी घ्यायची नाहीय.
> आयव्हरमेक्टीनचा वापर करायचा नाहीय.
> ताप आल्यावरच फक्त पॅरॅसिटॅमोल गोळी घ्यायची आहे, अन्यथा नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!