Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : GoodNews : देशातील कोरोना उतरू लागला , सक्रिय रुग्णांची संख्या १४ लाखांवर

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या २४ देशात कोरोनाचे १,००,६३६ इतके नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर २४२७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची संख्या एकूण ३, ४९, १८६ इतकी झाली आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही १४ लाखांवर आली आहे. गेल्या २४ तासांत १,७४,३९९ जण कोरोनातून बरे झाले. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. हा सलग ५ वा दिवस आहे.
भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. देशात गेल्या ६१ दिवसांत कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या ५ एप्रिलनंतर सर्वात कमी आहे. यासोबतच रोजचा पॉझिटिव्हिटी दर हा ६.३४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासांत २४२७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जवळपास ४३ दिवसांनी देशात करोनाने होणाऱ्या मृतांची संख्या इतकी कमी झाली आहे.
दरम्यान गेल्या २४ तासांत १५ लाख ८७ हजार ५८९ करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. तर १३ लाख ९० हजार ९१६ नागरिकांनी लस घेतली. यानुसार लस घेणाऱ्यांची एकूण संख्या ही २३ कोटी २७ लाख ८६ हजार इतकी झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!