MumbaiNewsUpdate : श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दिलीपकुमार रुग्णालयात

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई :  बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नसल्याने  दिलीप कुमार यांना आज सकाळी खार येथील हिंदुजा  रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी 8.30 वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisements

समोर आलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एक ते दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान दिलीप कुमार यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचं कमतरता असल्याने  गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येते.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार