Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने थोपाटले दंड

Spread the love

मुंबई: वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने आता दंड थोपाटले आहे. काँग्रेस उद्या सोमवारी इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. राज्यातील 1 हजार ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान तीन पेट्रोल पंपांवरही आंदोलन करण्यात येणार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या उद्या होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाही. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात उद्या सोमवार ७ जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

दरम्यान मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मुठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार असल्याची टीका करून ते म्हणाले कि , यूपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किंमतीवर त्याचा परिमाण झाला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका यूपीए सरकारने घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाठ वाढवलेले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!