Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मोठी बातमी : मुंबईत काय सुरु ? काय बंद ? मुंबई महापालिकेने केले जाहीर , संभ्रम झाला दूर ….

Spread the love

मुंबई :  राज्य सरकारने राज्याची पाच गटात विभागणी केल्यामुळे  शासनाने लावलेल्या निकषानुसार कोणता जिल्हा कोणत्या गटात किंवा स्तरात येतो यावरून मोठा संभ्रम निर्माण झाला असून त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय टास्क फोर्सशी चर्चा करून आपले गट जाहीर करीत आहेत. दरम्यान यावरून मुंबईतही मोठा गोंधळ निर्माण झाला होता त्याचा खुलासा आता झाला असून या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने आपली नियमावली जाहीर केली आहे.

काय सुरु आणि काय बंद राहील ?

शासनाच्या नियमानुसार मुंबई तिसऱ्या टप्प्यात येते त्यामुळे मुंबईतील लोकल ट्रेन तुर्तास सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार असून इतर क्षेत्रात काय सुरु आणि काय बंद राहील ? हे पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.

मुंबईतील रेस्टॉरंट, सलून, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू कऱण्यास मुंबई मनपाने परवानगी दिली आहे.
सलून, जीम, स्पामध्ये एसी सुरू करता येणार नाही.
लोकल ट्रेन तुर्तास बंदच राहणार आहे
सगळी दुकाने संध्याकाळी 4 पर्यंत खुली राहतील
शनिवार रविवार बंद राहतील
मॉल थेटर सिनेमागृह बंद राहणार
सकाळी 5 ते 9 नागरिकांना मॉर्निग वॉक ची मुभा
खाजगी कार्यालय आठवड्या दरम्यान संध्याकाळी 4 पर्यंत खुली राहतील.
खेळासाठी पहाटे 5 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 परवानगी
चित्रीकरणाला 5 वाजेपर्यंत परवानगी
सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू असणार
बसेसमध्ये आसन क्षमतेनुसार प्रवास करता येणार मात्र, उभे राहून प्रवास करता येणार नाही

आपलं सरकार

Click to listen highlighted text!