AurangabadNewsUpdate : औरंगाबाद कुठल्या पातळीत ? “अनलॉक औरंगाबाद” बद्दल उद्या निर्णय

औरंगाबाद : राज्यात सोमवारी ७ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार असून निर्बंधातील शिथिलतेच्या मर्यादेबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यात आल्या आहेत. या पातळ्यांच्या आधारे सबंधित स्थानिक प्रशासन तेथील परिस्थिती पाहून शिथिलतेबाबत योग्य तो निर्णय घेणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील निर्णयासाठी District Disaster Management Authority अर्थात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या रविवार (दि 6 जून) रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील रुग्णसंख्या, Positivity Rate व इतर अनुषंगिक बाबीवर चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर जिल्हयातील शिथिलतेच्या पातळीबाबत (Level Of Relaxation) निर्णय घेतला जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे.