Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यस्तरीय माध्यम शिक्षक संघटनेची स्थापना अध्यक्षपदी भटकर कार्याध्यक्षपदी चिंचोलकर

Spread the love

सोलापूर- महाराष्ट्रातील माध्यम शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापकांची मीडिया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम)  या जनसंवाद आणि पत्रकारिता विषयाच्या प्राध्यापकांच्या संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे . या संघटनेच्या अध्यक्षपदी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ .सुधीर भटकर तर कार्याध्यक्ष म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ रवींद्र चिंचोलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .

मीडिया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही संघटना स्थापनेचा निर्णय महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात तसेच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बैठकित घेण्यात आला . या बैठकीला जळगाव, मुंबई ,औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, अमरावती, पुणे, कोल्हापूर , वर्धा इत्यादी ठिकाणचे प्राध्यापक उपस्थित होते . सदर बैठकीत पुढील कामकाजाविषयी चर्चा  करून  सर्वानुमते कार्यकारिणी घोषित करण्यात आली. सदर संघटना माध्यम शिक्षण, संशोधनाच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्याचे कार्य करील अशी माहिती अध्यक्ष डॉ.. सुधीर भटकर यांनी दिली आहे .

कार्यकारिणी पुढील प्रमाणे

उपाध्यक्ष :  डॉ. सुंदर राजदीप, विभाग प्रमुख, जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, मुंबई विद्यापीठ ,मुंबई, सचिव :  डॉ. विनोद निताळे ,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, सहसचिव : डॉ.शाहेद शेख ,विभाग प्रमुख जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग (डॉ. रफिक झकेरिया हायर लर्निंग रीसर्च सेंटर, औरंगाबाद ), कोषाध्यक्ष डॉ रोहित कसबे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. कुमार बोबडे ,विभागप्रमुख जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग श्री शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय अमरावती, डॉ. संजय तांबट ,जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, डॉ. शिवाजी जाधव ,जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर , डॉ. मोई ज हक,विभाग प्रमुख, जनसंवाद विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,नागपूर , डॉ.सुहास पाठक मीडिया स्टडी सेंटर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड आदींची निवड करण्यात आली .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!