Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : खंडपीठाने नोंदवले निरीक्षण : म्यूकरमायकोसिसच्या उपचारासाठी मराठवाड्याला अपुरा औषध पुरवठा

Spread the love

औरंगाबाद – म्यूकरमायकोसिस च्या उपचारासाठी केंद्रशासनाकडून मराठवाड्याला कमी औषध पुरवठा झाल्यामुळे उपचार सुरु असलेल्या ६६९रुग्णांपैकी १२४जणांचा मृत्यू झाला.
यापुढे २ते९ जून दरम्यान केंद्राकडून राज्याला म्युकरमायकोसिस साठी केला जाणारा पुरवठाबाबत जिल्हानिहाय माहिती सादर करण्याचे निर्देश न्या. रविंद्र घुगे आणि न्या. बी.यु. देबडवार यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवतांना दिले आहेत.

म्यूकरमायकोसीस चे राज्यात ३हजार २००रुग्ण असून मराठवाड्यात ११७८आहेत. त्या पैकी ३८५बरे झाले असून १२४जण दगावले तर ६६९जणांवर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असणार्‍या रुग्णाला अॅम्फोटेरिसिन बी च्या ४ते५कुप्या रोज देण्याची गरज असतांना केवळ १ते २ कुप्यां दिले जात होते.राज्याला रोज अॅम्फोटेरिसीन बी च्या१४हजार कुप्यांची गरज असतांना केंद्राने केवळ ४ते ५हजार कुप्यांचा पुरवठा का केला.एकूण गरजेच्या केवळ ३० टक्के पुरवठा केल्यामुळे मराठवाड्यात गंभीर परिस्थिती उदभवली या बाबत असिस्टट

साॅलिसिटर जनरल अनिलसिंग यांना खुलासा करण्यास सांगितले.त्यावर केंद्रशासनाचे वकील अनिलसिंग म्हणाले की, मुंबई उच्चन्यायालयात केंद्राच्या वतीने सांगण्यात
आले की, येत्या जून मधे राज्याला अॅम्फोटेरिसिन बी व पोसाकोनाझोल व इसाव्हकॅनझोल नावाचे पर्यायी औषधी दिल्या जाणार आहेत. त्याश्राठी हाफकिन इंस्टीट्यूट सोबतच हैद्राबादच्या औषधी कंपन्याना परवाने देण्यात आले असून आणखी औषधी कंपन्याना केंद्राकडून परवाने देण्यात येत आहेत.अनिल सिंग यांच्या स्पष्टीकरणानंतर खंडपीठाने निर्देश दिले की, केंद्रशासनाने उच्चन्यायालयात दिलेले स्पष्टीकरण योग्य आहे तरीही महाराष्र्टात केंद्रशासनाकडून जिल्हानिहाय किती औषध पुरवठा केला जाणार आहे याचा सविस्तर खुलासा करावा.या कारवाईत अॅमिकस कुरिया म्हणून अॅड.सत्यजित बोरा यांनी कामकाज पाहिले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!