Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : सतत चार दिवस पाळत ठेवून 60 हजाराची लाच स्वीकारताना लाचखोर काॅन्स्टेबलला अटक

Spread the love

वाळूज औद्योगिक पोलिसांची चौकशी करण्यासाठी पोलिसआयुक्तांशी पत्रव्यवहार करण्याचे अधिक्षकांचे एसीबी कार्यालयाला आदेश

औरंगाबाद – लेबर सप्लायर कडून वाळूज औद्योगिक पोलिसाने ६०हजारांची लाच स्विकारल्यानंतर एसीबीचे पोलिस अधिक्षक राहूल खाडे यांनी वाळूज औद्योगिक पोलिसांची चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्तांशी पत्रव्यवहार करण्याचे आदेश कार्यालयाला दिले आहेत.अशी माहिती एसीबीच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

गणेश अंतरप असे लाचखोर अटक पोलिसाचे नाव आहे. एका प्रकरणात फिर्यादी कडून गणेश अंतरप याने १लाख रु लाच मागितली.पण फिर्यादीने या प्रकरणी वरिष्ठांना भेट घ्यायची इच्छा आरोपी अंतरप कडे व्यक्त केली.म्हणून आरोपीने वरिष्ठांची भेट घ्यायची असेल तर ५०हजार रु. आणखी वाढवावे लागतील अशी धमकी देत पैशांची मागणी केली. दरम्यान फिर्यादीने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर हे गेल्या ४दिवसांपासून वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्याच्या परिसरात सापळा लावत होते. शेवटी आज सकाळी १०वा. आरोपी पोलिस गणेश अंतरप याने पावडर लावलेले ६०हजार रु. स्विकारले अंतरप ला अटक करताच तो वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची नावे एसीबी च्या अधिकिर्‍यांना सांगू लागला.त्यामुळे आरोपीने सांगितलेल्या नावांची शहानिशा करण्या करता एसीबी निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्यास खूप उशीर झाला.

दरम्यान हा सगळा घटनाक्रम वरिष्ठांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करण्यासाठी पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचे आदेश दिले आहेत. वरील सापळा पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी त्यांचे सहकारी गंगाधर भाताने,अशोक नागरगोजे, कपिल गाडेकर, व चांगदेव बागूल यांच्या मदतीने पार पाडला.या कारवाईत अपर पोलिस अधिक्षक मारुती पंडित आणि पोलिस उपअधिक्षक ब्रम्हदेव गावडे यांनी मार्गदर्शन केले.

या प्रकरणी वरिष्ठ सुत्रांनी सांगितले की, सापळा रचल्यानंतर अटक केलेल्या आरोपींने वरिष्ठांची नावे घेतली तर त्यासंदर्भातील पुरावे तपासले जातात व जर ते खरे निघाले तर अटक आरोपीला माफीचा साक्षीदार करुन अटक आरोपीने सांगितलेल्या वरिष्ठांवर कारवाई केली जाते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!