Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCurrentNewsUpdate : ताजी बातमी : मंत्रालयात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनमुळे खळबळ !!

Spread the love

मुंबई : एका निनावी फोनने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी येताच  मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून संशयित बॉम्बचा शोध घेतला जात आहे. दरम्यान  मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे. या निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. साधारणतः तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याचे  त्या फोनवरुन सांगण्यात आले आहे. त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचं पथक याठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच मोठा फौजफाटही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला आहे.

आज रविवार असल्याने मंत्रालयाला सुटी असल्याने  सर्च ऑपरेशनमध्ये कोणताही अडथळा नाही हे विशेष. गेल्या अर्धा पाऊण तासापासून धमकीचा फोन सुरु आहे. तसेच खरंच हा फोन कोणी केला? याचा शोधही मुंबई पोलीस आणि मंत्रालयातील कंट्रोल रुमकडून घेतला जात आहे. दरम्यान पोलिसांच्या आणि बॉम्बशोधक पथकाच्या गाड्याही मंत्रालयासमोर मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच बॉम्बशोधक पथकासोबतच श्वान पथकेही मंत्रालयात दाखल झाली आहेत. कोणती संशयित वस्तू मिळतेय का? याचा कसून तपास केला जात आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!