Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : पैशाच्या वादातून रिक्षा मालकाने केला चालकाचा खून , रेकाॅर्डवरील दोघांसहित तिघांना बेड्या

Spread the love

औरंगाबाद – रिक्षा चालवत असतांना बिघाड झाल्यामुळे मालकाला रिक्षा परत करणार्‍या चालकाचा मालकाने भावांच्या मदतीने रिक्षा चालकाला चाकूने वार करुन खून केला.या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिसांनी रिक्षा मालकासह त्याच्या दोन्ही भावांना अटक केली आहे.दोन्ही भाऊ रेकाॅर्डवरचे गुन्हेगार आहेत.
शेखवसीम उर्फ शाहरुख शेख फरीद (२४) रा.बायजीपुरा संजयनगर असे मयताचे नाव आहे.तर नारेगावातील रिक्षा मालक आसिफ शेख मुसा (२९)त्याचे दोन भाऊ शेख रईस मुसा आणि शेख जब्बार शेख सत्तार अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींपैकी शेख रईस व शेख जब्बार हे दोघे रेकाॅर्डवरचे गुन्हेगार आहेत.मुसा यांची यांची रिक्षा मयत शेख वसीम चालवत होता. पण आज रविवारी शेकटा परिसरात रिक्षा खराब झाली.म्हणून वसीम ने मालक आसिफ मुसा ला रिक्षात बिघाड झाल्याची माहिती दिली.तेंव्हा शेख वसीम ने रिक्षा नारेगावला मालकाकडे आणून सोडला त्याच वेळेस वसीम आणि आसिफ मुसा मधे पैशाच्या वादातून भांडण झाले.म्हणून आसिफ मुसाने शेख रईस व शे जब्बार यांच्या मदतीने वसीम ला मारहाण करंत चाकूने भोसकले. वसीम चा मृत्यू झाल्याचे कळताच आसिफ ने वसीम च्या भावाला वसीम चा अपघात झाल्याचे सांगून वसीम ला कुटुंबियाच्या हवाली केले. वसीम च्या कुटुंबियांनी उपचारासाठी वसीम ला खाजगी रुग्णालयात दाखल केले.तेथील डाॅक्टरांनी वसीम ला घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. घाटीतील डाॅक्टरांनी वसीम ला मयत घोषित केल्यावर वसीम च्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु असतांना मयत वसीम च्या अंगावर शस्राचे वार असल्याचे डाॅक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी हा प्रकार पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांना कळवला.त्यानुसार पोलिस निरीक्षक पोटे यांनी खबर्‍याच्या मदतीने खुनाचा छडा लावला. मयत वसीम चा भाऊ नफिस च्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!