Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आणखी एक महिना देशाची कोरोना निर्बंधातून सुटका नाही , केंद्राच्या सूचना जारी….

Spread the love

नवी दिल्ली :  देशात कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांची संख्या अधिक असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अनेक राज्यांना यश येत असले तरी कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसाराग  रोखण्यासाठी हे निर्बंध गरजेचे असल्याचे  गृहमंत्रालयाने सांगितले  आहे. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसेच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असल्याचे  केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी म्हटले  आहे.

या आदेशात म्हटले आहे कि , रुग्णसंख्या कमी होत असली तरी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अद्यापही जास्त असल्याचे  मला नमूद करायचे  आहे. यामुळे कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाऊ शकते. दरम्यान स्थानिक परिस्थिती, गरजा आणि संसाधनांचा आढावा घेतल्यानंतर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

गृहसचिवांनी राज्यांनी कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धोरणे  आखण्यास सांगितले  आहे. याआधी २९ एप्रिलच्या आदेशात गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर कठोर निर्बंध लावण्याची सूचना केली होती. गेल्या एक आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या जिल्ह्यांची माहिती घ्या असंही यावेळी सांगण्यात आले  होते.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार निर्बंध लागू करावेत असे  सांगितले  आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेऊन त्वरित अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध करण्यात केलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे राज्यांना कठोर निर्बंध लागू करण्यासंबंधी विचार करण्यास सांगितले  आहे. याआधी आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी देशातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे  सांगताना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या मात्र अद्यापही खूप जास्त असल्याकडे लक्ष वेधले  होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!