Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalNewsUpdate : राहुल – प्रियांकाच्या ट्विटला उत्तर देताना केंद्रीय मंत्री डॉ . हर्षवर्धन यांनी केली केली गिधाडांशी तुलना !!

Spread the love

नवी दिल्ली :  देशातील अनेक रुग्णालयात जाणवणारी बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा , लसींचा तुटवडा , अपुऱ्या  वैद्यकीय आणि पायाभूत सुविधांच्या  पार्श्वभूमीवर  काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी  मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल  केल्यांनतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना ‘ धरतीवरील गिधाडे ‘ असल्याची टीका केली आहे.

काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेताना हर्षवर्धन यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर अधिक विश्वास आहे. तसेच  मृतांच्या नावाने राजकारण करणे काँग्रेसच्या या गिधाडांकडून शिकावे . मृतांच्या नावाने राजकारण करणं ही काँग्रेसची स्टाईल आहे. झाडांवरील गिधाडे  सध्या दिसेनासी झाली असली तर त्यांच्यातील ऊर्जा जमिनीवरील गिधाडांमध्ये आल्यासारखे  वाटत आहे. राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर जास्त विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील ‘या’ गिधाडांकडून शिकावे” .

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी काय म्हटले होते ?

दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला देत आकडे खोते  बोलत नाहीत पण भारत सरकार बोलते  असे  म्हटले  होते. या वृत्तपत्राने भारत सरकार सांगत असलेले कोरोनाचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता. तर  काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी  यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या  फेसबुक पोस्टच्या माध्यमातून  त्यांनी “जबाबदार कोण?” असे  म्हणत काही प्रश्न विचारले आहेत. “आता लसीवर फक्त मोदीजींचा फोटो आहे, उर्वरित जबाबदारी राज्यांवर टाकली गेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे लसीच्या कमतरतेबद्दल माहिती पाठवत आहेत” अशी परिस्थिती असल्याचे  प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

प्रियांका गांधी यांनी पुढे नमूद केले आहे कि , “आज, भारताच्या 130 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 11% लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि केवळ 3 % टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. मोदीजींच्या लस उत्सवाच्या घोषणेनंतर गेल्या एका महिन्यात लसीकरण 83% घटले. आज मोदी सरकारने देशाला लसीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकलले आहे. सरकारचे अयशस्वी लस धोरण या लसीच्या कमतरतेमागे असल्याचे दिसून येते. याला जबाबदार कोण? कोरोनाच्या सुरुवातीपासूनच कोरोना लस सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रसिद्धीचे साधन बनले. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आज इतर देशांच्या लसीच्या देणग्यांवर अवलंबून आहे. तेसच लसीकरणाच्या बाबतीत जगातील कमकुवत देशांच्या रांगेत सामील झाला आहे” असेही  प्रियांका गांधी यांनी म्हटले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!