Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : हौसेला मोल नाहीच !! “त्यांनी ” विमानात केला विवाह …

Spread the love

मदुराई : देश आणि जग भलेही कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करीत असेल पण हौसेला मोल नाही असे म्हणतात ते खरेच आहे. कोरोनामुळे सर्वच कार्यक्रमावर बंधने आलेली असताना  याच काळात  एका  हौशी जोडप्याने जमिनीवर नाही तर अवकाशात  विवाह केल्याचे वृत्त आहे.  यानिमित्ताने तामिळनाडूचे रहिवासी असलेल्या या जोडप्याचा विवाह चर्चेत आला आहे.

दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून या प्रकरणाच्या चौकशी आदेश देण्यात आले आहेत. एअरलाईन आणि एअरपोर्ट प्रशासनाकडून या प्रकाराचा विस्तृत अहवाल मागवण्यात आला असून  स्पाईस जेटच्या विमानातील क्रू ला सध्या ड्युटीवरून हटविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. कोविड नियमांचे  पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

त्याचे झाले असे कि , राज्यात कोरोना संक्रमणा दरम्यान घालण्यात आलेल्या मदुराईच्या एका जोडप्याने  विमानात विवाह करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी संपूर्ण वऱ्हाडासाठी या विमानाची तिकीटेही बुक केली होती. विमानाने  उड्डाण घेतल्यानंतर असे  काही होणार आहे, याची आपल्याला कल्पनाही नव्हती असे  मदुराई विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे. मदुराई ते बंगळुरू या प्रवासा दरम्यान विमान हवेत असतानाच या जोडप्याचा विवाहसोहळा पार पडला. विवाहासाठी जोडप्याच्या नातेवाईकांनी संपूर्ण विमान भरले होते.

दरम्यान या विवाहाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या व्हिडिओंमध्ये पारंपरिक पोशाखात सजलेले वर-वधू एकमेकांना हार घालताना आणि फोटो काढताना दिसत आहेत. विमान आपल्या क्षमतेनुसार नातेवाईकांनी खच्चून भरलेले  दिसत आहे. यातील अधिकांश लोकांनी मास्क परिधान केलेला नाही. तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचीही पायमल्ली झाल्याचे  दिसून आहे. स्पाईस जेटचे  हे चार्टर्ड विमान मदुराईवरून एक दिवस अगोदर बुक करण्यात आले  होते . विमानतळ अधिकाऱ्यांना विमानाच्या उड्डाणादरम्यान होणाऱ्या या विवाह सोहळ्याबद्दल माहिती नव्हती, असे  मुदराई विमानतळ संचालक एस सेंथिल वलवन यांनी म्हटले आहे.

एअरलाईनच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, २३ मे २०२१ रोजी मदुराईच्या एका ट्रॅव्हल एजंटमार्फत या विमानाचे  बुकिंग करण्यात आले  होते . विवाहानंतर ‘जॉय राईड’ म्हणून ही बुकिंग करण्यात आली होती. एजंट तसेच प्रवाशांना कोविड गाईडलाईन्सची संपूर्ण माहिती देण्यात आली होती. तसेच त्यांना विमानाच्या उड्डाणादरम्यान कोणत्याही प्रकारचा सोहळा न करण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रवासादरम्यान अनेकदा गाईडलाईन्स समजावल्या जात होत्या. यामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवर बंदीचाही समावेश होता. परंतु, वांरवार सांगूनही जोडप्याने  आणि त्यांच्या नातेवाईकांनी गाईडलाईन्सचे  पालन करण्यास नकार दिला. आता एअरलाईननुसार, योग्य ती कारवाई केली जाईल.

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!