Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात दिलासादायक स्थिती , कोरोनाबाधित आणि मृत्यूची संख्या होत आहे कमी !!

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात दोन लाखांपेक्षाही कमी कोरोनाबाधित आढळले असल्याचे दिलासादायक वृत्त आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने  दिलेल्या माहितीनुसार देशात १ लाख ९६ हजार ४२७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ६९ लाख ४८ हजार ८७४ वर पोहचली आहे . देशात सध्या २५ लाख ८६ हजार ७८२ सक्रिय रुग्ण आहेत. यापूर्वी १४ एप्रिल रोजी करोनाबाधितांची संख्या दोन लाखांहून कमी होती.

दरम्यान  कोरोना मृत्यूतही थोडी घट झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३५११ जणांचा मृत्यू झाला आहे  त्यामुळे  देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ०७ हजार २३१ झाली आहे. तर गेल्या  २४ तासात तब्बल ३ लाख २६ हजार ८५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आत्तापर्यंत २ कोटी ४० लाख ५४ हजार ८६१ रुग्ण कोरोनावर मात केली आहे.

देशातील कोरोना एक नजर 

एकूण कोरोना बाधितांची  संख्या : २ कोटी ६९ लाख ४८ हजार ८७४

एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या : २ कोटी ४० लाख ५४ हजार ८६१

सक्रिय रुग्णांची संख्या  : २५ लाख ८६ हजार ७८२

एकूण मृत्यू : ३ लाख ०७ हजार २३१

कोरोना लसीचे एकूण डोस घेणारांची संख्या : १९ कोटी ८५ लाख ३८ हजार ९९९

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १९ कोटी ८५ लाख ३८ हजार ९९९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील २४ लाख ३० हजार २३६ लसीचे डोस सोमवारी देण्यात आले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, २४ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३३ कोटी २५ लाख ९६ हजार १७६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून यातील २० लाख ५८ हजार ११२ नमुन्यांची करोना चाचणी सोमवारी  एकाच दिवसात करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!