Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : कारचे टायर फुटून भीषण अपघात, जीएसटी उपयुक्त अभिजीत घवले यांच्यासह दोन ठार

Spread the love

लोणावळा  : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ इनोव्हा कारचे टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सोमाटणे येथील  रुग्णालयात उपचार चालू आहेत. या भीषण अपघातात जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजीत घवले यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत शंकर गोडा यतनाल यांचाही समावेश आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी कि , अभिजीत घवले यांच्या आई-वडिलांचा आज लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे या कार्यक्रमासाठी अभिजित घवले आपल्या कुटुंबीयांसह लातूरला निघाले होते. यामध्ये त्यांचे साडू, बायको आणि चालक यांचा समावेश होता. दरम्यान आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जात असताना घवले यांच्या इनोव्हा कारच्या समोरील टायर फुटले. त्यानंतर भरधाव कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात कार मधील दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये अभिजीत घवले आणि शंकर गोडा यतनाल यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत असलेले अपघातात वाहन चालक तसेच अभिजीत घवले यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. दोघांनाही उपचारासाठी सोमाटणे येथील पावना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहन बाजूला केले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!