Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : योगगुरू रामदेव यांचा दुसरा व्हिडीओसुद्धा व्हायरल , पुन्हा उडवली डॉक्टरांची खिल्ली

Spread the love

नवी दिल्ली : एक वाद संपत नाही तोच  योगगुरू रामदेव यांचा  आणखी एक व्हिडिओ व्हिडिओ समोर आल्याने वाद निर्माण झाला आहे. रामदेव बाबांनी आता कोरोना योद्ध्या डॉक्टरांवर टीका केली आहे. ‘अॅलोपॅथी ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे’ असे  वादग्रस्त वक्तव्य केल्याने तीन दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांना कायदेशीर नोटीसही बजावली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या पत्रानुसार रामदेव यांनी पत्र लिहून खेद  व्यक्त करीत आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटल्याने या हा वाद संपणार तोच  रामदेव यांचा पुन्हा डॉक्टरांची खिल्ली उडवत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये योगगुरू रामदेव  यांनी एका योग कार्यक्रमात एका तरुणाशी झालेल्या चर्चेचे  उदाहरण दिले. डॉक्टरांना टर… टर… म्हणत त्यांनी टीका केली आहे. तसेच १ हजार डॉक्टरांनी कोरोनावरील लसीचे दोन डोस घेऊनही त्यांचा मृत्यू झाला. हे डॉक्टर स्वतःलाही वाचवू शकले शकले नाहीत, असे  रामदेव बाबा व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

‘कुठलीही पदवी नसताना मी डॉक्टर’

डॉक्टर व्हायचे  असेल तर रामदेव बाबांसारखे व्हा. ज्याच्याकडे कुठलीही डीग्री नाही आणि तरीही सर्वांचा डॉक्टर आहे. विदाउट एनी डीग्री अँड डिग्निटी आय एम ए डॉक्टर, असं रामेदव बाबा या व्हडिओत म्हणाले आहेत.

दरम्यान डॉक्टरांविरोधात अशा प्रकारे बेजबाबदार वक्तव्य करत त्यांची खिल्ली उडवून रामदेव बाबा पुन्हा अडचणीत आले आहेत. यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले  आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी या प्रकरणी दखल घेऊन रामदेव बाबांवर कारवाई करावी, अशी मागणी आयएमएने केली आहे.

‘रामदेव बाबांना अटक करा’

या व्हिडिओनंतर  रामदेव बाबा यांना अटक करा, अशी मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवासन बी. व्ही. यांनी केली आहे. तर डॉक्टर रागिनी नायक यांनी रामदेव बाबांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. रामदेव बाबांनी पहिल्यांदाच अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीका केलेली नाही. यापूर्वी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. आता रामदेव बाबांनी IMA आणि फार्मा उद्योगाला २५ प्रश्न केले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!