Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : या कारमध्ये नोटांचे इतके घबाड सापडले कि , पोलीस दिवसभर मोजतात राहिले !!

Spread the love

डुंगरपूर : राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुजरातकडे जाणाऱ्या कारला पोलिसांनी थांबवून या कारची झाडा झडती घेतली तेंव्हा कारमधील नोटांचे घबाड पाहून पोलिसच चक्रावून गेले. विशेष म्हणजे या नोटा मोजण्यासाठी पोलिसांना अक्षरशः नोटा मोजण्याच्या मशीन आणाव्या लागल्या आणि नोटा मोजण्यासाठी पूर्ण दिवस परिश्रम घ्यावे लागले. पोलिसांनी गुजरातकडे जाणारी हि  कार जप्त केली.  शनिवारी राष्ट्रीय महामार्ग ८ वरून ही कार गुजरातकडे जात असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस सध्या दोघांची चौकशी करत आहेत.

या विषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि , डुंगरपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलिसांनी हि कार रोखून कारची  झाडाझडती घेतली असता, त्यात मोठी रक्कम आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी कार ताब्यात घेतली. हे कोट्यवधी रुपये दिल्लीहून गुजरातला हवालाच्या मार्गे नेण्यात होते, अशी माहिती आता समोर येत आहे. पोलीस उपअधीक्षक मनोज सवारिया म्हणाले, कि , पैसे जप्त करण्यात आले आहेत आणि आरोपींची चौकशीही केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण हवालाशी संबंधित असल्याचे  दिसून येत आहे. पोलीस सध्या तपास करत असून, आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

विशेष म्हणजे कारची झाडाझडती घेतल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. कारमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा होत्या. कारमध्ये असलेल्या नोटा मोजण्यासाठी पोलिसांना बँकेमधून मशीन्स मागवाव्या लागल्या. सकाळी सुरू झालेलं नोटा मोजण्याचं काम सायंकाळपर्यंत सुरू होतं. ज्या कारमधून ही रक्कम घेऊन जाण्यात येत होती. त्या गाडीचा क्रमांक ‘डीएल८ सीएएक्स३५७३’ असा आहे. या कारमध्ये तब्बल साडेचार कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!