Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे योगगुरु रामदेव यांना पत्र !!

Spread the love

नवी दिल्ली : योगगुरु रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यामुळे योगगुरु रामदेव यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएने  आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएने  योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी योगगुरु रामदेव यांना पत्र लिहून वक्तव्य मागे घेण्यास सांगितले  आहे. करोना काळात डॉक्टरांबाबत असं विधान करणे  दुर्देवी असल्याचे  मत त्यांनी व्यक्त केले  आहे.

आपल्या पत्रात आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे कि ,  “अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका करणे  दुर्दैवी आहे. आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. कोरोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवदूत आहेत. अशा वेळेत आपण को रोना योद्ध्यांचा अपमान केल्याने  खूप दु:ख झाले  आहे. आपण जे स्पष्टीकरण दिले  आहे त्याने वेदना शमणार नाहीत. लाखो करोना रुग्णांचा मृत्यू अ‍ॅलोपॅथी औषधं घेतल्याने झाल्याचे  आपले वक्तव्य चुकीचे  आहे. आपल्याला करोनाविरुद्धची लढाई एकत्रितपणे लढायची आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात टाकून रुग्णांची सेवा करत आहेत. ते दिवसरात्र एक करून रुग्णांची सेवा करत आहेत”, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले  आहे. “आशा आहे की आपण या विषयावर गंभीरतेने विचार कराल आणि करोना योद्धयांचा सन्मान कराल. तसेच वादग्रस्त वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल” असेही त्यांनी पुढे म्हंटले  आहे.

दरम्यान योगगुरु रामदेव यांनी करोना मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचे  सार्वजनिकरित्या सांगितले  आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंतजली योगपीठने योगगुरु रामदेव यांची  तशी भावना नसल्याचे  सांगितले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!