Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ‘अॅलोपॅथी ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे’ !! काय आहे बाबा रामदेवचा विवाद ?

Spread the love

नवी दिल्ली : सध्या योगगुरु बाबा रामदेव आपल्या व्हिडीओ मुळे अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली असून  ‘अॅलोपॅथी ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे’ असे  बोलणाऱ्या बाबा रामदेव यांच्याविरुद्ध साथरोग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’कडून (IMA) करण्यात आली आहे. इतकेच नाही तर रामदेव यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर असोसिएशनला संघर्षावर उतरण्याची वेळ येईल आणि यासाठी न्यायालयाचीही मदत घेतली जाईल, असा इशाराही आयएमएने  दिला आहे.

https://twitter.com/drasmalhi/status/1395750915114561545

विशेष म्हणजे स्वत: मॉडर्न मेडिसीन अॅलोपॅथीचा उपचार घेणाऱ्या आरोग्य मंत्र्यांनी एक तर रामदेव यांचे आरोप मान्य करत अॅलोपॅथी उपचारच अमान्य करत रोखावेत किंवा धाडस दाखवत रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे  खुले आव्हानच आयएमएकडून आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना देण्यात आले आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सरकारसोबत मॉडर्न मेडिसिन अॅलोपॅथी डॉक्टर खांद्याला खांदा लावून लढत आहेत. आत्तापर्यंत या लढाईत १२०० डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत. विशेष म्हणजे जे अॅलोपॅथीवर टीका करत आहेत त्या रामदेव रामदेव आणि त्यांचे सहकारी बाळकृष्ण हेदेखील अॅलोपॅथी उपचार घेत आले आहेत, असे  म्हणत आयएमएने रामदेवांच्या आरोपातला फोलपणा उघड केला आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर योगगुरु म्हणून ओळख असलेले रामदेव  केवळ आपल्या कंपनीच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ते जनतेला भूलवत आहेत आणि जनतेची फसवणूक करत आहेत, असाही आरोप आयएमएने केला आहे. नुकताच योगगुरु बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ रामदेव ‘अॅलोपॅथी’ (आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती) औषधोपचार पद्धतीवर टीका करताना दिसत आहेत. ‘क्लोरोक्विन, रेमडेसिविर, अँन्टीबायोटीक, फॅबिफ्लून, स्टेरॉईड ही सगळी औषधं निष्काम ठरली. प्लाझ्मा थेरेपीवरही बंदी आणली गेली. लाखो लोकांचा मृत्यू अॅलोपॅथी उपचारांमुळे झाला’ असे  म्हणताना रामदेव या व्हिडिओत दिसत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, ICMR कडून परवानगी मिळालेली नसताना बाबा रामदेव ‘कोरोनिल’चा करोनाविरुद्ध रामबाण उपाय म्हणून प्रचार करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, बाबा रामदेव यांच्यासोबत स्टेजवर खुद्द आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेदेखील ‘कोरोनिल’चा प्रचार करताना दिसले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!