Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Information Update : जाणून घ्या खून आणि खुनाचे प्रकार, पोलीस तपास कसा करतात ?

Spread the love

जगदीश कस्तुरे

खून म्हटलं की धडकी भरते, डोळे विस्फारतात, पोलिस दिसतात,पण हे खून किती प्रकारचे आहेत पोलिस गुन्हा घडल्यावर कशा पध्दतीने तपास करतात त्यांना त्यात यश येते कधी येत नाही.तपास करतांना घडंत असलेल्या चुका याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.चुकांमुळे खुन अनडिटेक्टेड राहतात.

चान्स मर्डर, प्लान मर्डर,हिस्र्टी मर्डर हे जनरली खूनाचे प्रकार असतात.याशिवाय अनैतिकसंबंधातून झालेला खून हा फार निर्दयीपणे झालेला असतो. त्याला सडनली हेवाॅक अचानक भावना भडकून कहर करणे हा ही एक प्रकार आहे.

चान्स मर्डर मधे आपण तो कसा घडतो ते बघूयात

उदा: दोन मित्र कार मधून प्रवास करत असतील रस्त्यात चहा घेण्यासाठी थांबले.तेवढ्यात समोरुन दुसरा कारचालक आला व गाडी पार्क करायची अक्कल नाही का असे म्हणंत शिवीगाळ करंत असतांना दोन पैकी एकाचा मानसिक तोल ढळतो व जवळपास पडलेली जड वस्तू समोरच्याच्या डोक्यात घालतो.तिथे खून होतो पण उद्देश नव्हता.पहिल्यांदाच खून करणारा इसम हा प्रोफेशनल हत्यारांचा वापर करंत नाही. जवळ जे उपलब्ध असेल त्याने खून करतो.भाजी कापायची सुरी, पाटा, वरवंटा,स्र्कू ड्रायव्हर अशी हत्यारे वापरतो.
प्लान मर्डर मैत्रीत घडतात एखादा भाऊ प्राॅपर्टीसाठी दुसर्‍या भावाचा ठरवून मर्डर करतो. किंवा सुपारी देऊन एखादा मित्र त्याला दुखावलेल्या मित्राचा नियोजनबध्द पध्दतीने काटा काढतो. हिस्र्टी मर्डर प्रकार सुध्दा देण्या घेण्याच्या व्यवहारातून घडतात मोठमोठ्या व्यावसायिक संबंधातून घडले जातात.तसेच कौटुंबिक वादातूनही हिस्र्टी मर्डर घडतात. ज्या खुनाला पार्श्र्वभूमीअसते. असे खून प्रोफेशनल हत्यारांचा वापर करुन केले जातात.उदा:गुप्ती, तलवार,रिव्हाल्वर,कोयता.हे खूनी रेकाॅर्डवरचेच असतात.तर अनैतिक संबंधातून झालेला खून हा निर्दयीपणे केलेला असतो. या खुनात मयताचा कमरेच्यावर शस्राने वार करुन खून केला जातो.सडनली हेवाॅक पध्दतीचा खून म्हणजे अचानक झालेला करण्यात आलेला कहर असतो.रस्त्याने जाताना झालेल्या वादात धार्मिक किंवा कौटुबिंक, सामाजिक भावना उत्तेजित झाल्या की,बेदम मारहाणीत खून हौतो.शहरातील गेल्या काही वर्षात घडलेले आठवणीत राहण्यासारखे खून म्हणजे जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रूती भागवत खून खटला,छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमीनाबी खून प्रकरण,किंवा वर्षभरापूर्वी घडलेला सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कूरीअर व्यवस्थापकाचा खून यांचा आतापर्यंत तपास लागला नाही.अशा खुनांमधे दर दोन वर्षाला किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तपासाधिकारी बदलले जातात.वरील खूनामधील श्रूती भागवत खून प्रकरणाचा तपास मात्र गुन्हे अन्वेषण विभागाकडे आहे.एवढा सगळा खूनाच्या गुन्ह्यांचा अभ्यासपूर्ण तपास पोलिस करंत असूनही तपासाची लिंक चुकीची मिळणे, आरोपी माहित असूनही तो पुराव्या अभावी पकडला न जाणे, आरोपीकडून पध्दतशीरपणे पुरावे नष्ट करणे आरोपीही हे ओळखून असतो की पोलिस त्याच्या मागावर आहेत.अशी कारणं असू शकतात.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!