Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराचा खुनाचा प्रयत्न, दोघे अटकेत

Spread the love

औरंगाबाद – रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराला विष्णूनगर मधील दोघांनी किरकोळ कारणावरुन आज सकाळी साडेदहा वा. विष्णूनगर परिसरात चाकूचे सपासप वार करुन गंभीर जखमी केले.या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विजय सुभाष बिरारे (२४) असे रेकाॅर्डवरील जखमी गुन्हेगाराचे नाव आहे. तर विकी नगरकर आणि गणेश बोर्डे यांना अटक करण्यात आली आहे. तिघेही एकमेकांचे मित्र आहेत.
सकाळी १०-३० च्या सुमारास विजय बिरारे हा जवाहरकाॅलनी मधे उभा होता.त्यापूर्वीच आरोपी नगरकर आणि बोर्डे त्या ठिकाणी बसलेले होते. बिरारे समोर येताच गणेश बोर्डे याने शिवीगाळ सुरु केली. व नगरकर ने कारण विचारताच त्याच्यावर बोर्डे ने खुनी हल्ला केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तायडे करत आहेत..

बंदोबस्तावरील पोलिसांच्या मदतीने मोबाईल चोर पकडला

औरंगाबाद – जाधववाडी परिसरात आज पहाटे ५.३० वा. जाधववाडी परिसरात बंदोबस्त करणार्‍या पोलिसांच्या मदतीने पहिल्यांदाच मोबाईल चोरणारा चोरटा पकडला.या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी शेख शफीक शे.अजीस(३०) रा.बायजीपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीने भाजीविक्रेते कचरु निकम यांचे व काशिनाथ आळणे यांचे मोबाईल लंपास करताच आळणे यांनी बंदोबस्तावरील पोलिसांच्या मदतीने चोरटा पकडला.या प्रकरणी पो.नि.अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाछाली पीएसआय पाटील तपास करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!