Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

InformationUpdate : ICMR कडून आता कोविड उपचारातून ‘प्लाझ्मा थेरेपी’ला वगळले

Spread the love

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) कोविडच्या उपचारांतून ‘प्लाझ्मा थेरेपी’चा वापर हटवण्याचा निर्णय घेतलाअसल्याचे वृत्त आहे. आयसीएमआरच्या नव्या आदेशानुसार, देशात यापुढे कोविड रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जाणार नाही. कोरोना बाधित  रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अनेक जणांवर प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात आला आहे. परंतु, त्यानंतरही या रुग्णाचा  मृत्यू आणि आजाराची गंभीरता कमी होण्यास मदत झालेली दिसून आली नाही. त्यामुळे आयसीएमआर, कोविड १९ वर गठीत करण्यात आलेली नॅशनल टास्क फोर्स आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी महत्त्वाची, असा समज असलेल्या प्लाझ्मा थेरपीचा मोठा फायदा होत नसल्याचं मत अनेक घटकांतून व्यक्त झाल्यानंतर या थेरपीची शिफारस यापुढे न करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आलाय. आयसीएमआरची एक बैठक गेल्या आठवड्यात पार पडली होती. प्लाझ्मा थेरपीचा मर्यादित उपयोग व अनेकदा या उपायाचा अयोग्य वापराच्या बाबी लक्षात घेता तिच्या वापराची शिफारस थांबवावी, असं मत या बैठकीत एकमुखानं व्यक्त करण्यात आलं. त्यानुसार उपचारांच्या मार्गदर्शक तत्वांमधून प्लाझ्मा थेरपी वगळण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला, अशी माहिती आयसीएमआरतर्फे रात्री देण्यात आली.

टास्क फोर्सच्या नव्या गाईडलाईन्स

नव्या गाईडलाईन्सनुसार, कोविड रुग्णांना तीन प्रकारांत विभागण्यात आले आहे.

१ : अगदी सौम्य लक्षणं असलेले रुग्ण – या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे

२ : मध्यम तीव्रतेची लक्षणं असलेले रुग्ण – या रुग्णांना कोविड वॉर्डमध्ये दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे

३: गंभीर लक्षणं असलेली रुग्ण – या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!