Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : कोरोनाबाधितांच्या संख्येत कमी पण मृतांच्या संख्येत मोठी वाढ

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून येत असली तरी  मृत्यू्चे प्रमाण अद्याप चिंतेचा विषय आहे. भारतात, गेल्या २४ तासात कोरोना संक्रमणामुळे ४३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात कोरोनाचे २,६३,५३३ नवे  रुग्ण आढळले असून  ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतात आतापर्यंत २,५२,२८,९९६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून  २,१५,९६,५१२ रुग्णांना  डिस्चार्ज मिळाला आहे तर २,७८,७१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

करोना उपचारात आता प्लाझ्मा थेरपीला नाही 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांवर उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता. मात्र केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने कोरोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळले  आहे. यासंबंधी टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. आतापर्यंत करोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी होती. केवळ सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!