Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : बहिणीच्या अंत्यसंस्कारापेक्षा पेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारी आरोग्यसेविका !!

Spread the love

अमरावती : कोरोनाच्या संसर्गाला गांभीर्याने घेत नात्यापेक्षा कर्तव्याला महत्व देत अमरावती तालुक्यातील नरसिंगपूर उपकेंद्रात कार्यरत एका आरोग्यसेविकेने स्वत:च्या सख्ख्या बहिणीच्या अंत्यविधीलाही प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन उपस्थित राहून आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिल्याने या आरोग्यसेविकेच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. असेच कर्तव्य बजावणाऱ्या हैदराबादेतील बाळंत झालेल्या एका डॉ. निलोफर यांनी विश्रांती न घेता आठच दिवसात पुन्हा ड्युटी जॉईन केली . त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांची सेवा करणाऱ्या या कोरोना योद्ध्यांना सलाम !!

या विषयीचे अधिक वृत्त असे कि , आरोग्यसेविका श्वेता जैस्वाल या शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नरसिंगपूर उपकेंद्रात कार्यरत आहेत. त्यांच्या बहिणीवर  पुणे येथील रूग्णालयात उपचार चालू होते मात्र  उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. खरे तर सख्खी बहिण जाण्याची वेदना मोठी होती. पण श्वेताताईंनी स्वत:ला सावरले व कर्तव्याला प्राधान्य दिले. श्वेताताई या आरोग्यसेविका म्हणून लसीकरणाची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत.

एका बाजूला आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणावर चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला वैयक्तिक दु:ख बाजूला सारून श्वेताताईंनी कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला. आपल्या दु:खाला वाट मोकळी करून देताना श्वेता जयस्वाल म्हणाल्या की, ‘बहिण जाण्याचे दु:ख अत्यंत यातनादायी होते. मात्र, माझ्या कार्यक्षेत्रात कुणाच्याही कुटुंबात असे घडू नये, इतकाच माझा प्रयत्न आहे. माझी बहिण गेली. तसेच इतरांच्याही कुटुंबात कुणाची आई, कुणाची पत्नी, कुणाची मुलगी, तर कुणी पूर्ण कुटुंबच हरवून बसले. सगळी मानवजात संकटात असताना वैयक्तिक दु:खाने खचून जाण्याची ही वेळ नव्हती. म्हणून मी बहिणीच्या अंत्यविधीला ऑनलाईन उपस्थित राहिले आणि आरोग्यसेविका म्हणून माझे कर्तव्य बजावले.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!