Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ , रिकव्हरी रेट आता ८८.६८ टक्क्यांवर

Spread the love

मुंबई  : गेल्या २४ तासात  राज्यात ३९ हजार ९२३ नवे करोनाबाधित आढळले असून ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांमध्य हे प्रमाण वाढल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आता ८८.६८ टक्क्यांवर गेला आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात ४२,५८२ नवे करोनाबाधित तर ५४,५३५ डिस्चार्ज नोंदवण्यात आले होते. शुक्रवारी नव्या करोनाबाधितांच्या संख्येत अजून घट झाली असली तरी राज्यातही मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे.

दरम्यान शुक्रवारच्या नव्या आकडेवारीनंतर राज्यात आत्तापर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा ५३ लाख ९ हजार २१५ इतका झाला आहे, तर त्यातल्या ४७ लाख ७ हजार ९८० रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यापैकी सध्या राज्यात ५ लाख १९ हजार २५४ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्यातील मृतांचे आकडे चिंताजनक

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट दिलासा देणारा ठरत असला तरी, राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा मात्र अजूनही खूप मोठा आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात एकूण मृतांचा आकडा ७९ हजार ५५२ इतका झाला आहे. एकूण मृत्यूदर १.५ टक्के इतका जरी नोंदवला गेला असला, तरी एकूण रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे हा मृत्यूदर कमी दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र मृतांचा आकडा जास्तच राहिला असल्याचं गेल्या महिन्याभरातल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण कुठल्या जिल्ह्यात?

पुणे जिल्हा – 96028 सक्रिय रुग्ण

नागपूर जिल्हा – 40496 सक्रिय रुग्ण

मुंबई – 35843 सक्रिय रुग्ण

ठाणे – 31526 सक्रिय रुग्ण

राज्यातील एकूण सक्रिय रुग्ण – 5,19,254

आज कुठल्या विभागात किती रुग्ण?

ठाणे विभाग – 5138

नाशिक विभाग – 6932

पुणे विभाग – 10401

कोल्हापूर विभाग – 4260

औरंगाबाद विभाग – 2571

लातूर विभाग – 2446

अकोला विभाग – 4225

नागपूर विभाग – 3950

एकूण – 39923

आपलं सरकार

Click to listen highlighted text!