Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ४२ हजार ५८२ नवे रुग्ण , ५४ हजार ५३५ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

मुंबई :  राज्यात  गेल्या २४ तासांत ४२ हजार ५८२ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ४६ हजार ७८१ इतकी होती. कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी घट झाली असून असून हा फरक ४ हजार १९९ इतका आहे. तर आज एकूण ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५८ हजार ८०५ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ३३ हजार २९४ वर आली आहे.

दरम्यान गेल्या २४ तासांत  राज्यात एकूण ८५० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ८१६ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४६ लाख ५४ हजार ७३१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३४ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण संख्या 

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ३३ हजार १२९२९४ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १ लाख १ हजार १८१ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ३६ हजार ३३८ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ३० हजार ९२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४५ हजार ९९६ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ६१७ इतकी आहे.

या बरोबरच अहमदनगरमध्ये २८ हजार ८६२ इतकी आहे. औरंगाबादमध्ये ८ हजार ८३९, नांदेडमध्ये ही संख्या ४ हजार ८६८ इतकी आहे. जळगावमध्ये १० हजार ९११, तसेच तर रायगडमध्ये एकूण ८ हजार ७८४ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या १० हजार ९३७, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजार ९१२ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ६७९ इतकी आहे.

३५,०२,६३० व्यक्ती होम क्वारंटाईन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ०३ लाख ५१ हजार ३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२ लाख ६९ हजार २९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५ लाख ०२ हजार ६३० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २८ हजार ८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!