Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

InformationNewsUpdate : मास्क विषयीच्या “त्या ” मॅसेजपासून सावधान

Spread the love

नवी दिल्ली:  सोशल मीडियावरून कोरोनाशी संबंधित अनेक मॅसेजेस फिरवले जातात. विशेष करून कुठले तरी घरगुती उपाय केल्याने कोरोना बरा होतो अशा कितीतरी अफवा लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात परंतु याला कुठलाही आधार नसतो हे लक्षात घेणे महत्वाचे असते. सध्या सोशल मीडियावर सतत मास्क परिधान केल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचा एक मेसेज फिरत आहे. हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे.त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो . वास्तविक या मॅसेजमध्ये कुठलेही तथ्य नसून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पीआयबीने केले आहे.


काय आहे व्हायरल मेसेज?

मानवी शरीराला दिवसात 550 लीटर ऑक्सिजनची गरज असते. एरवी ही गरज सहजपणे पूर्ण होते. मात्र, मास्क परिधान केल्यास शरीराला फक्त 250 ते 300 लीटर ऑक्सिजनचाच पुरवठा होतो. तसेच मास्क लावल्याने शरीरातील कार्बनडायऑक्साईडची पातळीही वाढते. त्यामुळे मास्क घालणे धोकादायक ठरु शकते, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


व्हायरल होणारा मेसेज खोटा

दरम्यान हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट टीमने याची पडताळणी केली. त्यानंतर या गोष्टी काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. मास्कचा वापर केल्यामुळे ऑक्सिजन पातळी खालावत असल्याचा मेसेज फेक आहे. असा कोणताही शास्त्रीय पुरावा आढळलेला नाही, असे प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!