Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : एक नजर : राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला, जाणून घ्या एका क्लिकवर राज्य आणि देशातील कोरोनाची स्थिती

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 31 मे  पूर्ण आणि  1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने  घेतला असल्याचे वृत्त आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले असून या पत्रकानुसार ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत.


दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 3,62,727 नवीन रुग्णसंख्येची भर पडली असून 4,120 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी देशात 3.48 लाख नवीन रुग्णांची भर पडली होती तर 4,205 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे 1.09 टक्के इतकं झालं आहे तर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 83 टक्के झालं आहे.


देशातील कोरोनाची आजची स्थिती 


एकूण रुग्ण : दोन कोटी 37 लाख 03 हजार 665
कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 97 लाख 34 हजार 823
सक्रिय रुग्ण : 37 लाख 04 हजार 099
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 54 हजार 197
एकूण लसीकरण : 17 कोटी 72 लाख 14 हजार 256
गेल्या 24 तासात 18 लाख 94 हजार 991 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत.


कोरोनाची राज्यातील स्थिती


बुधवारी राज्यात 46 हजार 781 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 58,805 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के एवढे झाले आहे. राज्यात बुधवारी 816 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.4 टक्के एवढा आहे.


देशातील लसीकरणाची स्थिती 

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोरोना लसीच्या डोसची संख्या 17.70 कोटींहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या 24 तासात 17.70 लाख लसीचे डोस देण्यात आले. जागतिक स्तरावर सध्या भारत सर्वात जलद वॅक्सिनेशन करणारा देश आहे. भारतात 17 कोटी लसीचे डोस 114 दिवसांमध्ये देण्यात आले आहे. तसेच हा आकडा गाठण्यासाठी चीनला 119 दिवसांचा कालावधी लागला होता तर अमेरिकेने  हे लक्ष्य 115 दिवसांमध्ये गाठले  होते.

दरम्यान 18 ते 44 वयाच्या 4,17,321 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील लसीचे डोस घेतलेल्या एकूण लोकांची संख्या 34,66,895 झाली आहे. लसीकरण मोहिमेच्या 117 व्या दिवशी (12 मे) लसीचे एकूण 17 लाख 72 हजार 261 लसीचे डोस देण्यात आले आहेत. एकूण 9,38,933 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आणि 8,33,328 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. एकूण लसीच्या डोसमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, यूपी, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरल, बिहार, आंध्र प्रदेश जवळपास 66 टक्के देण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!