Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासांत ३ लाख ४८ हजार ४२१ नवीन कोरोनाबाधित तर ४,२०५ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

नवी दिल्ली : देशात दररोज साडेतीन ते चार लाखांच्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांतील म्हणजे मंगळवारची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली असून, या  माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४८ हजार ४२१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत तीन लाख ५५ हजार ३३८ जणांनी करोनावर मात केली. चिंतेची बाब म्हणजे देशात एका दिवसात झालेल्या मृतांच्या संख्येने  नवा विक्रम नोंदवला आहे. देशात मंगळवारी ४,२०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींची संख्या आता २,५४,१९७ वर पोहोचली आहे.

दरम्यान भारतात गेल्या ऑक्टोबर महिन्यात सापडलेला करोनाचा बी.१.६१७ हा उत्परिवर्तीत विषाणू वेगाने पसरत असून त्यामुळे जगभरातच जोखीम निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तंत्रज्ञ प्रमुख मारिया व्हॅन केरखोव यांनी सांगितले की, बी.१.६१७ हा मूळ विषाणूपेक्षा वेगाने पसरणारा असून तो घातक असल्याची माहिती मिळाली आहे. या विषाणूचा मूळ प्रकार ऑक्टोबर २०२० मध्ये सापडला होता पण नंतर तोच विषाणू डिसेंबरमध्ये काही उत्परिवर्तनांसह सापडला होता. भारताली उत्परिवर्तनाचा हा विषाणू १९ देशांत पसरला असून अनेक देशांनी भारतात जाण्यास प्रवासबंदी लागू केली आहे.

विशेष करून तरुणांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केल्यामुळे तरुणांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले  की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील डेटा तपासून पाहिला असता यामध्ये वयात जास्त फरक असल्याचे  दिसत नाही. प्रतिकूल परिणामासाठी ४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक जास्त असुरक्षित असतात.

१६ राज्य आणि केंद्राशासित प्रदेशांमध्ये रुग्णसंख्येत सतत वाढ

भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान १६ राज्यांमध्ये ज्यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पंजाब यांचा समावेश आहे तिथे रुग्णसंख्या वाढत असतानाही देशात मात्र सध्या करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण कमी होताना दिसत असल्याचं केंद्र सरकारने सांगितले आहे. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणा हे त्या १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी आहेत जिथे दैनंदिन रुग्णसंख्येत सतत वाढ किंवा घट होत आहे. दरम्यान १६ राज्य आणि केंद्राशासित प्रदेशांमध्ये रुग्णसंख्येत सतत वाढ होत असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले  आहे. यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल. पंजाब, आसाम, ओडिशा, हिमाचल प्रदेश, मेघालय आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!