Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा , राहुल गांधी यांचे ट्विट

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : देशात कोरोनाने रौद्र रूप धारण केले  आहे. कोरोनामुळे रोज हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तरीही पंतप्रधानांना नव्या संसदेचे  म्हणजे सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच सुचत नाही अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही असेही राहुल गांधी म्हणाले.

Advertisements

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे  की, “देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही.” दरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देशातल्या अर्ध्या लोकसंख्येकडे इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना ऑफलाइन बुकिंगचीही सुविधा मिळावी.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!