Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आधी देश मग दुनिया , लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरमचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला

Spread the love

नवी दिल्ली :  देशात लसींचा तुटवडा असल्याने कोविशिल्ड लसीचे ५० लाख डोस युकेला पाठवण्याचा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसेच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही केंद्र सरकारने सिरमची विनंती फेटाळून लावली आहे. सिरमकडून युकेला लस पुरवण्याचे  आश्वासन देण्यात आले  होते , त्याआधारे ही विनंती करण्यात आली होती. भारतीय लसीच्या  निर्यातीवरून केंद्र सरकारवर विरोधकांकडून मोठी टीका केली जात होती. त्या दबावातून शेवटी केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

देशात निर्माण होणाऱ्या लसींचा पुरवठा सर्वात आधी राज्यांना केला जावा आणि त्यानंतरच निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सिरमला परवानगी नाकारण्यात आली आहे. राज्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा व्हावा यासाठी सिरमशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले  आहे. देशात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे  लसीकरण केले  जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यांकडून मागणी होत आहे.

“कोविशिल्ड लसीचे हे ५० लाख डोस आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी उपलब्ध आहेत. राज्यांना हे डोस मिळवण्यास सागंण्यात आले  आहे. खासगी रुग्णालये देखील हे लसीचे डोस मिळवू शकतात,” असे  अधिकाऱ्याने सांगितले  आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सिरमशी संपर्क साधत लवकरात लवकर लसींचे डोस मिळवण्याची प्रक्रिया सुरु करण्यास सांगितलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!