Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ‘म्युकरमायकोसिस’ झालेल्यांवर सरकार करणार मोफत उपचार

Spread the love

‘म्युकरमायकोसिस’ आहे तरी काय?


म्युकरमायकोसिस दुर्मिळ असला, तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती  कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात (ICU) असलेल्या, तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस  म्हणजेच म्युकरमायकोसिस होणे  तसेच त्यामुळे त्यांचा मृत्यू होणे  अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण कोविड-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असे डॉक्टर्सचे  म्हणणे  आहे. कोविड-19 मधून चांगल्या पद्धतीने  बरे  होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेगाने वाढ होणे  ही काळजीची बाब आहे, असे  सर गंगाराम हॉस्पिटलने  प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले  आहे.


जालना : कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना समोर येत असलेल्या ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराने नागरिकांच्या चिंता वाढवल्या आहेत. राज्य सरकारने  या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी सोमवारी जालन्यात सांगितले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत यावर उपचार केले जाणार आहेत. तसेच या आजाराचे लवकर निदान आणि उपचार व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती  करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोरोनातून उपचार घेऊन बरे झालेल्या अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिस  या बुरशीजन्य आजाराची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या आजारामध्ये नाकाजवळ, ओठांच्या आजुबाजुला काळे  ठिपके दिसतात. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर नाक किंवा श्वसनयंत्रणे मार्फत  बुरशी शरिरात प्रवेश करते आणि नंतर ती डोळे, मेंदू यावर प्रामुख्याने  हल्ला करते  अशी माहिती  टोपे यांनी दिली आहे . लक्षणे  दिसल्या दिसल्या लगेच निदान आणि उपचार करणं यावर सर्वात गरजेचे  असल्याचे ही टोपे म्हणाले. त्यामुळे  लोकांना याची माहिती व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणामावर जनजागृती करणार असल्याचे  टोपे यांनी सांगितले. तर यावरील उपचार करण्यासाठी औषधी अत्यंत महागडी आहेत. त्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत या आजाराचा समावेश करण्याची महत्त्वाची घोषणा टोपेंनी केली. त्यामुळं राज्यात 1000 रुगणालयात यावर मोफत उपचार होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

‘म्युकरमायकोसिस’ या आजारावर उपचार करण्यासाठी लागणारं अॅम्फोतेरसीन हे औषध अत्यंत महागडे  आहे. सात दिवस दोन वेळा म्हणजे चौदा इंजेक्शनचा डोस याचा घ्यावा लागतो. त्यामुळं खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्याला ते अनेकदा परवडणार नाही. त्यामुळं या औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. पूर्वी या इंजेक्शची किंमत दोन ते अडिच हजार होती ती मागणी वाढल्याने  आता सहा हजारांवर गेली असल्याचेही टोपे म्हणाले. या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!