Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ऑक्सिजन घेऊन निघालेला टँकर रस्ता चुकला आणि ७ रुग्णांचे प्राण गेले !!

Spread the love

हैदराबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही देशातील अनेक रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणे  कठीण झाले आहे. त्यात अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. देशात आरोग्य व्यवस्थाही कोलमडून पडली आहे. हैदराबादमध्ये तर ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने ७ जणांना प्राणाला मुकावे  लागले असल्याचे वृत्त आहे.

या वृत्तानुसार हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात ७ रुग्णांची स्थिती अत्यवस्थ होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. मात्र ऑक्सिजनचा दाब कमी प्रमाणात झाल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून कमी दाबाने पुरवठा होत असल्याचे  रुग्णालय प्रशासनाने सांगितले  होते . यासाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र हा टँक भरण्यासाठी निघालेला टॅकर रस्ता चुकला आणि ऑक्सिजन मिळण्यास विलंब झाल्याने ७ जणांचा जीव गेला.

विशेष म्हणजे वाट चुकलेल्या या टँकरला रस्ता दाखवण्यासाठी नारयानगुंडा पोलिसांनी प्रयत्नही केले. मात्र टँकर येईपर्यंत उशिर झाला होता. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. टँकरला येण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर का तयार केला नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!