IndiaNewsUpdate : दिल्लीतील एकाच रुग्णालयात ८० डॉक्टर कोरोनाबाधित

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे .  येथील सरोज हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरचा अंत झाल्यानंतर या हॉस्पिटलमधील जवळपास ८० डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या  हॉस्पिटलमध्ये आता सर्व ओपीडी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण ८० डॉक्टरांपैकी १२ जण रूग्णालयात दाखल आहेत. तर इतर सर्व डॉक्टर्संना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याच हॉस्पिटलचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. रावत यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

Advertisements

दरम्यान, अनेक रुग्णांना  बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने  प्राण गमावावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या काही दिवसांत १३ हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर २७३ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत सध्या जवळपास ८६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Advertisements
Advertisements

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन यावेळी दिल्लीत गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, हा लॉकडाऊन उद्या १० मे रोजी संपणार आहे. परंतू दिल्लीतील कोरोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात येणार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. तसेच, लॉकडाऊनचा परिणाम चांगल दिसून येत आहे. २६ एप्रिलनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना संक्रमणाचा दर ३० टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आल्याचेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

आपलं सरकार