Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मराठा समाजातील तरुणांसाठी प्रकाश आंबेडकरांची मागणी

Spread the love

मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा समजला आरक्षण देण्याचा निर्णय रद्दबातल केल्यानंतर  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख  प्रकाश आंबेडकर यांनी  मराठा समाजातील तरुणांसाठी  नवी मागणी केली आहे. आपलट ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे कि , ‘सर्व मराठा संस्थाचालकांनी तात्काळ त्यांच्या शिक्षण संस्थेतील मॅनेजमेंट कोटा गरीब मराठा विद्यार्थ्यांसाठी खुला करावा. तसेच आपापल्या संस्थेत गरीब होतकरू मराठा युवांना  ‘विनामूल्य’ नोकरी देण्याचे जाहीर करावे,’ असे म्हटले आहे.

अर्थात ही मागणी करत असताना हा आरक्षणाला पर्याय नसल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी  म्हटले  आहे. ‘हा आरक्षणाला पर्याय नाही पण, समाजाशी किमान बांधिलकी आहे,’ अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टांकडून रद्द करण्यात आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांनीही मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय म्हणजे गरीब मराठ्यांवरील अन्याय असल्याचे  म्हटले  आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गरीब मराठ्यांवर अन्याय झाला. न्यायालयाच्या विरोधात जाऊ नका हे आम्ही आधीपासून सांगत होतो. न्यायालयाने ठरवलेल्या आयोगामार्फत आरक्षण दिले  तरच ते टिकेल. तसे न करता नियमांविरुद्ध जाऊन सर्वपक्षीय श्रीमंत मराठा नेतृत्वाने गरीब मराठ्यांची फसवणूक केली आहे,’ अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!