Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : तरुण मराठी ऑक्सिजन संशोधकाचा ऑक्सिजन अभावीच तडफडून मृत्यू !!

Spread the love

चेन्नई : ऑक्सिजनच्या उपयोगवर आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधक म्हणून नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या तरुण मराठी संशोधकाचा ऑक्सिजन अभावी तडफडून चेन्नईत मृत्यू झाला.  डॉ. भालचंद्र काकडे असे या संशोधकाचे नाव असून ते मूळचे कोल्हापूरचे होते. निधन झाले. ते 44 वर्षांचे होते.

डॉ. भालचंद्र काकडे यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. किरकोळ लक्षणे असल्याने चार दिवस त्यांनी घरातच उपचार घेतले. पण, एक दिवस प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नई इथल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. त्यांची प्रकृतीही सुधारली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते आणि ते उपचाराला अतिशय चांगला प्रतिसाद ते देत होते. पण, मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. यामुळे तिथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामध्ये डॉ. काकडे यांचाही समावेश होता.

डॉ. भालचंद्र काकडे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा वापर करुन विविध क्षेत्रात काय करता येईल याचे संशोधन सुरु केले. या संशोधनात त्यांनी सात पेटंटही मिळवली. जपान, अमेरिका इथली फेलोशिपही त्यांना मिळाली. यामुळे आंतरराष्ट्रीय संशोधक म्हणून त्यांचे  जगभर नाव झाले होते. ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या या संशोधकाचा केवळ ऑक्सिजन पुरवठा थांबल्यामुळेअंत झाला. त्यांचा मृत्यू  झाला.  त्याच्या अशा निधनामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!