Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात देशात ४ लाखाहून अधिक बाधित तर ४ हजार रुग्णांचा मृत्यू

Spread the love

नवी दिल्ली : कोरोनामुळे गेल्या २४ तासांतील मृतांची संख्या देशाची झोप उडवणारी आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. आतापर्यंतची ही देशातील एका दिवसातील  उच्चांकी नोंद असून, २४ तासांत चार लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान देशात दररोज साडेपाच हजार मृत्यू होतील अशी भीती वजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा खरा ठरतोय की, काय अशी शंका येत  आहे. देशात कोरोनाचं थैमान सुरू असून, करोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं वाढत चालला आहे. देशात दररोज चार लाखांच्या आसपास रुग्ण आढळून येत असून, दररोज साडेतीन हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात २४ तासांत चार लाख एक हजार ७८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख १८ हजार ६०९ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे देशात पहिल्यांदाच चार हजार १८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ३८ हजार २७० इतकी झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!